बॉलिवुडचे सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे निधन

SHARE:

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते विनोदी अभिनेते असरानी (Asrani) यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. ते गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी होतं. 1 जानेवारी 1941 ला त्यांचा जन्म जयपूरमध्ये झाला. 1960 ला त्यांचं करिअर सुरु झालं, त्यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचं विनोदाचं टायमिंग आणि अनोख्या शैलीमुळं ते लोकप्रिय ठरले. शोले चित्रपटातील त्यांचं  अंग्रेजो के जमाने के जेलर हा डालयॉग असणारी जेलरची भूमिका लोकप्रिय ठरली. खट्टा मीठा, चुपके चुपके या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.

असरानी यांनी सेंट झेविअर स्कूल, जयपूरमधून शिक्षण घेतल्यानंतर राजस्थान कॉलेजमध्ये पदवी पूर्ण केली. त्यानंतर असरानी यांनी रेडिओ आर्टिस्ट म्हणून काम केलं. असरानी यांच्या पत्नीचं नाव मंजू बन्सल इरानी आहे. असरानी यांनी 2004 मध्ये काँग्रेसचं सदस्यत्व घेतलं होतं. असरानी यांनी सिनेमा क्षेत्रात येण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला, त्यांनी गुड्डी या चित्रपटातून पदार्पण केलं. तो सिनेमा देखील हिट ठरला.

NT News 24
Author: NT News 24

Chief Editor

Leave a Comment