सापटणे येथील ढवळे-पाटील यांच्या सुनबाईचे ‘सुपर-एन्ट्री’! थेट हेलिकॉप्टरने आगमन, टेंभुर्णी परिसरात जोरदार चर्चा!..

SHARE:

NT NEWS 24 प्रतिनिधी – टेंभुर्णी
टेंभुर्णी (जि. सोलापूर): माढा तालुक्यातील सापटणे (टें.) येथील सुपुत्र प्रणव ढवळे-पाटील आणि परंडा तालुक्यातील सोनगिरी येथील कन्या ऋतुजा अशोक वेताळ यांचा शुभविवाह येत्या 13 डिसेंबर रोजी टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आला आहे. विवाह सोहळ्यापूर्वीच वधू आणि वऱ्हाडी मंडळींचे हेलिकॉप्टरने झालेले आगमन हे परिसरात सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
वधूचे ‘हेलिकॉप्टर’ने मंगलमय आगमन
माढा तालुक्यात उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले विठ्ठल ढवळे-पाटील यांचे सुपुत्र प्रणव यांचा विवाह सोहळा विशेष आकर्षण ठरला आहे. वधू ऋतुजा अशोक वेताळ (सोनगिरी) यांचे मंगळवार, 09 डिसेंबर रोजी दुपारी हेलिकॉप्टरने सापटणे येथे आगमन झाले.
कुटुंबीयांकडून भव्य स्वागत:
वधू ऋतुजा, त्यांचे आई-वडील आणि अन्य कुटुंबीयांचे हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर ढवळे-पाटील कुटुंबीयांनी परिसरात विशेष व्यवस्था करून त्यांचे औपचारिक आणि उत्साहाचे स्वागत केले. या आगमनाने ढवळे-पाटील यांच्या सुनबाईचे ‘हेलिकॉप्टरने आगमन’ झाल्याची जोरदार चर्चा आहे.
विवाह सोहळ्याचे ठिकाण
वधूचे स्वागत झाल्यानंतर सर्व वऱ्हाडी मंडळी, आई-वडील आणि कुटुंबीयांनी पुन्हा हेलिकॉप्टरने ढवळे-पाटील यांच्या मूळ गावी प्रस्थान केले. विवाह सोहळा टेंभुर्णी-कुर्डुवाडी रोडवरील जिल्हा दूध संघाच्या विस्तीर्ण मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या मैदानावर भव्य मंडप, पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, वधू-वरांचे आगमन व हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी मार्ग आणि मैदान तयार ठेवण्यात आले होते.
उद्योगपती आणि प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती
या शाही विवाह सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबांतील ज्येष्ठ व्यक्ती, नातेवाईक, तसेच टेंभुर्णी आणि सापटणे परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आगमनाने विवाह सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला असून, येत्या 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या शुभविवाहास टेंभुर्णी परिसरातून नागरिक शुभेच्छा देत आहेत.

Bhayyasaheb Kambale
Author: Bhayyasaheb Kambale

NT NEWS 24

Leave a Comment