
NT NEWS 24 प्रतिनिधी इंदापूर –
१ जानेवारी २०२६ रोजी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो भीमसैनिक पुण्यात दाखल होतात. या अनुयायांचा प्रवास विनाअडथळा आणि सुखकर व्हावा, यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आयु. संजयभैया सोनवणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
शौर्य दिनाचे औचित्य साधून ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत भीमा कोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या सर्व भीमसैनिकांच्या वाहनांना टोलमधून माफी देण्यात आली आहे.
या टोल नाक्यांवर मिळेल सवलत:
या विशेष मोहिमेअंतर्गत सरडेवाडी, बावडा आणि पाटस या मुख्य टोल प्लाझावर भीमसैनिकांच्या वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. शौर्य दिनाच्या ५०० शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांना कोणत्याही तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे नियोजन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी ९९७५५१७००० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Author: Bhayyasaheb Kambale
NT NEWS 24
