
NT NEWS 24 प्रतिनिधी टेंभुर्णी। माढा तालुक्यातील १६ वर्षीय मुलीवर बळजबरी करत अत्याचाराचे चित्रीकरण सोशल मीडियाद्वारे व्हायरल करतो म्हणून अत्याचार करणारे दोघे व त्यांना साथ देणारे वकील अजिंक्य संगीतराव (रा. टेंभुर्णी) यांच्यासह पाच जणांविरुद्ध पोक्सो व अॅट्रॉसिटी अंतर्गत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
निखिल सुधीर लांडगे (रा. दहिवली, ता. माढा), अमोल धनाजी गरड (रा. उपळवटे, ता. माढा), शाहीद बाबा मुलाणी (रा. उपळवटे, ता. माढा), अजिंक्य संगीतराव (रा. टेंभुर्णी), तात्या शामराव जगताप (रा. दहिवली) अशी आरोपींची नावे आहेत.
मुलीवर निखिल लांडगे, शाहीद मुलाणी यांनी २० सप्टेंबरला अत्याचार करत व्हिडिओ काढला.
कोणाला सांगीतल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. शुक्रवारी (दि.७) टेंभुर्णीतून उपळवटेकडे स्कुटीने जाताना दहिवली ओढ्याजवळ क्रेटा कार (क्र. एमएच ४५ एझेड ०५५५) आडवी लावली. ‘तु निखिलचे का ऐकत नाही, असे म्हणत अजिंक्य संगीतराव तात्या शामराव, निखिल यांनी शरीरास झोंबाझोंबी केली. संगीतराव याने जातीवाचक शिवीगाळ करत ‘तुला सांगीतलेले कळत नाही का’, असे म्हणत लज्जास्पद बोलला. सर्व आरोपी फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
Author: Bhayyasaheb Kambale
NT NEWS 24
