- ‘ऑपरेशन अमनिस्ताद’ अंतर्गत भारताची मदत: शक्तिशाली भूकांपाचा फटका बसलेल्या व्हेनेझुएला देशाच्या मदतीसाठी भारताने ‘ऑपरेशन अमनिस्ताद’ सुरू केले असून हवाई दलाची दोन C-17 ग्लोबमास्टर विमाने मदत साहित्यासह रवाना झाली आहेत.
- लोहगड किल्ला मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅकवर: पुणे येथील लोहगड किल्ल्यावरून ढकलून झालेल्या केतन अग्रवाल या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचा खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
- कोल्हापुरात पुन्हा उपसाबंदी: जिल्ह्यातील पाणीटंचाई व नियोजनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने आजपासून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा उपसाबंदी लागू केली आहे.
- सारथीच्या यशावर मुख्यमंत्र्यांचे कौतुक: स्पर्धा परीक्षांमध्ये ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात कौतुक केले.
- नाशिक सिंहस्थ कुंभमेळा रेल्वे मेगाप्लॅन: आगामी कुंभमेळ्यासाठी देशभरातून १५० विशेष ट्रेन धावणार असून नाशिकरोडसह देवळाली, ओढा आणि खेरवाडी स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे.
- पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मोठा निर्णय: महापालिकेने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्रेत्यांना विनाशुल्क परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र पीओपी मूर्ती आढळल्यास १० पट दंडाची तरतूद केली आहे.
- हवामान अंदाज: मान्सूनने महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून, पुढील ३ ते ४ दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Author: NT News 24
Chief Editor
